Dhule News : सर्वांत मोठे रेल्वेस्थानक नरडाणा : आमदार रावल; फडणवीस यांच्याकडे नेत्यांच्या विविध मागण्या

Latest Dhule News : उपमुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी (ता. १०) शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी जामफळ धरण शिवारात झालेल्या सभेत आमदार रावल, डॉ. भामरे यांनी विविध मागण्या केल्या.
jaykumar rawal
jaykumar rawalesakal
Updated on

चिमठाणे : केंद्र व महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृपादृष्टी असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ सर्वांगीण विकासाकडे झेपावत आहे. यात मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात नरडाणा (ता. शिंदखेडा) सर्वांत मोठे रेल्वेस्थानक होणार आहे, असा विश्‍वास व्यक्त करत माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या केल्या. (biggest railway station Nardana MLA Rawal statement)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.